सुनिल केदार यांच्या व्यक्तव्याचा शिवसेनेचा निषेध ; जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

0
268
1

सालेकसा / बाजीराव तरोने

महाराष्ट्रात महायुति सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही फसवी आहे ,काग्रेस सत्तेमध्ये आल्यावर ही बोगस योजना बंद करणार असल्याचे व्यक्तव्य काग्रेस नेते सुनिल केदार यांनी केले आहे. राज्यातल्या महिलांची मत विकत घेण्याचा प्रयत्न महायुति सरकार कडुन कऱण्यात येत असल्याचा आरोपही केदार यांनी केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या या योजनेला बोगस बोलणारे काँग्रेस नेते माजी आमदार सुनिल केदार यांचा सालेकसा तालुका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला असून सालेकसा तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गोंदिया च्या नावे निवेदन देण्यात आले.       यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे, तालुका प्रमुख विजय नागपुरे, उपतालुका प्रमुख रवि थेर, युवासेना तालुका प्रमूख मायकल मेश्राम, शहर प्रमुख बाजीराव तरोने, घनशाम नागपुरे,ललित किरसान,रोशन लिल्हारे,संतोष लिल्हारे, महिला तालुका प्रमुख पंचशीला वैद्य,तारा नागपुरे, लता थेर, सरिता मेंढे, मंजु सोनवाने, ईमला लिल्हारे,दुर्गवंती राऊत, संगीता नेवारे, सिता लिल्हारे, ललिता लिल्हारे ,आदि उपस्थिती होते.