अहेरी : तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावीत आहेत.तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आता सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे.अशावेळी प्रशासनाने अलर्ट झोनवर काम करने आवश्यक आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी आज अहेरीचे बिडीओ यांच्या कार्यालयात भेट घेत विविध विकास कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
यांनतर ते बोलत होते.सध्या अजय कंकडालवार यांच्या सामाजिक कार्याची जोरदार चर्चा होत आहे.अनेक अडत्यांना त्यांनी मदतीचा हात देत ते सामाजिक औदार्य जोपासत आहेत.
यावेळी चर्चा दरम्यान अजयभाऊ कंकडालवार सोबत किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,शंकर सिडाम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.