अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यातून काढून येत्या 2 महिन्यात नव्याने विकासकामांना सुरुवात करू.. राजे अम्ब्रीशराव महाराज.

0
163

आलापल्लीचा महागणराया गणेशोत्सव मंडळ, यांच्या वतीने आयोजित मुंबई येथील प्रसिद्ध गायिका श्रुती जैन यांचा 7 स्टार आर्केस्ट्राचे उद्घाटन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा शुभहस्ते साई मंदिराचा बाजूला गोंड मोहल्ला, आलापल्ली येथे नुकतेच संपन्न झाले, हा आर्केस्ट्रा बघण्यासाठी आलापल्ली, अहेरी, नागेपल्ली सह परिसरातील हजारो श्रोत्यांनी तुफान गर्दी केली होती, उपलब्ध जागाही गर्दीसमोर कमी पडली..!! उद्घाटक मनुन बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज ह्यावेळी म्हणाले अहेरी विधानसभा क्षेत्र सद्या संपूर्ण खड्डयात गेला असून, रस्ते, पाणी, विज, आरोग्य सर्वच क्षेत्रात जनतेला कमालीचा त्रास होत आहे, तरी आपले मंत्री साहेब हेलिकॉप्टरने हवेत फिरत आहेत त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही, तुम्ही मला ह्यावेळी आशीर्वाद द्या हे सर्व चित्र बदलवून येत्या 2 महिन्यात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्डयातुन बाहेर काढून विकासकामांना नव्या जोमाने सुरुवात करू असे प्रतिपादन राजे साहेबांनी केले तेंव्हा उपस्थित हजारो श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत राजेंना दाद दिली.!ह्या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष विजय खरवडे सह महागणराया गणेश मंडळ तथा नवयुवक गणेश मंडळ, आलापल्लीचा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले..!!