मराठी भाषा समृद्ध झाली तरच मराठी वृत्तपत्र सृष्टी जगेल – संपादक राजेश राजोरे

0
72
1

सचिव डॉ दिशा गेडाम कार्याध्यक्ष जगदीश खेडकर यांची निवड..

मराठी विषय शिक्षक महासंघाची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी घोषित.

गोंदिया : मराठी विषय शिक्षक महासंघ गोंदियाची जिल्हा कार्यकारीणी आभासी सभा घेऊन दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक राजेश राजोरे बुलढाणा उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की “मराठी भाषा समृद्ध झाली तरच मराठी वृत्तपत्र सृष्टी जिवंत राहील” असे मनोगत व्यक्त केले.

मराठी विषय शिक्षक महासंघाची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी आभासी सभा आयोजित करून घोषित करण्यात आली.

या सभेला मार्गदर्शक म्हणून देशोन्नती बुलढाणा चे संपादक राजेश राजोरे उपस्थित होते . सभेचे अध्यक्ष महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती, प्रमुख अतिथी सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई, उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर, कोषाध्यक्ष संजय लेनगुरे भंडारा , कार्याध्यक्ष डॉ. मनिषा रिठे वर्धा हे प्रामुख्याने उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांची बांधणी या महासंघाद्वारे करण्यात आली असून मराठी भाषेच्या उन्नतीसाठी हे महासंघ कार्यरत आहे, याचा अभिमान आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत आवश्यक आहे असे पारिपत्रक काढले त्यासाठी शासनाचे अभिनंदन केले. तसेच मराठी भाषा समृद्ध झाली तरच मराठी वृत्तपत्र सृष्टी जिवंत राहील. महाराष्ट्रात मातृभाषेला अग्रस्थान देणे आवश्यक आहे व ही भाषा अभिजात भाषा व्हावी असे मार्गदर्शन केले.

या आभासी सभेला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले . या सभेत राज्यकार्यकारणीचे दहा पदाधिकारी तर विविध जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच गोंदिया जिल्ह्यातील समस्त मराठी विषय शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पवन कटरे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. सचिव डॉ दिशा गेडाम, कार्याध्यक्ष जगदिश खेडकर, उपाध्यक्ष आर दिघोरे व जागेश्वर भेंडारकर, सहसचिव शालिनी पटले, संघटन सचिव एम एच पटले, कोषाध्यक्ष गुणीलाल पटले, सल्लागार प्रा ज्योतिक ढाले, खोटेले सर, संतोष मेश्राम व तांगडे सर, तालुका प्रतिनिधी रवी रहांगडाले, धनंजय मेंढे, दिपाली चौधरी, शुभांगी खरवडे, भिमराव गजभिये, धनंजय गव्हाणे, भोजराज दोनोडे, प्रा हिवराज बावनकर व हनवते यांची जिल्हा कार्यकारिणी त नियुक्ती केली.

या सभेचे प्रस्ताविक जिल्हा प्रतिनिधी प्रा. पवन कटरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष मेश्राम यांनी केला तर सूत्रसंचालन डॉ दिशा गेडाम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. धनंजय मेंढे यांनी केले.