देवरी : तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र ग्रा.प.पुराडा येथील सी एस सी सेंटर चे संचालक भूमेश विठोबा साखरे यांच्या वाढदिवसा निमित्त पाच दिवसीय दि.१६ ते २० सप्टेंबर दरम्यान एस सी सेंटर अंतर्गत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपरोक्त शिबिरात शासनाच्या वतीने चालत असलेल्या विविध योजनांचे कार्ड जसे आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, मतदान कार्ड, विश्वकर्मा फॉर्म,इत्यादि जवळपास २५० लोकांचे कार्ड बनवून मोफत वाटप करण्यात आले.एवढेच नाही तर शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहीती देण्यात आली. या शिबिरात परिसरातील पुराडा,मुरपार,ढिवरीनटोला,फुक्कीमेटा,लोहारा आदि गावातील लोकांचा समावेश होता.भूमेशने प्रेरणादायी सामाजिक बांधिलकी दाखवून वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी निलेश विजय आचले, एस विजय शहारे, मयूर वालदे यांनी परिश्रम घेतले. तसेच सरपंच लक्ष्मीशंकर मड़काम,पो.पा.सुभाष अंबादे व सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.