राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची “ परिवर्तन जनआशीर्वाद यात्रा” 23 सप्टेंबर पासून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात..!

0
1690
1

तिरोडा – तिरोडा-गोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे “ वारसा संघर्षाचा…. नव्हे वंशवादाचा… वेध विकासाचा… आरंभ नव्या पर्वाचा..!” या बॅनर खाली विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्यासाठी व नव परिवर्तन करत आशीर्वाद घेण्यासाठी दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी मौजा सितेपार येथून भगवान श्री हनुमानजीचा आशीर्वाद घेत “ परिवर्तन जनआशीर्वाद यात्रा ” युवा नेते मा. रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या नेतृत्वात संपूर्ण तिरोडा गोरेगाव विधानसभा भर प्रवास करणार आहे.
महापुरुषांच्या विचारांचा क्षेत्र घडविण्यासाठी, सामाजिक न्याय, क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी, महिला सुरक्षा, सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी, शेतकरी, शेतमजुरांना न्याय देण्यासाठी, सिंचन क्रांती, जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी व रयतेच्या मनातील राज्य निर्माण करत नव परिवर्तन घडविण्यासाठी ही यात्रा विधानसभा क्षेत्रातील १७० गावांमधून प्रवास करीत जनआशीर्वाद माघणार आहे.


तरी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेने या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आव्हाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तिरोडा-गोरेगाव विधानसभा च्या वतीने करण्यात आलेली आहे.

 

 

Previous articleप्रेरणादायी सामाजिक बांधिलकी दाखवून केला वाढदिवस साजरा
Next articleआमगाव पोलीसांच्या तत्परतेने शेकडो जनावरांचे वाचले प्राण