आमगाव : आज दि.२१ सप्टेंबर शनिवार रोजी दुपार दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीतील येथे पाऊळदौना – बोरकन्हार सीमेलगत कालीबाड़ी समोरील पांधन रस्त्यावर जवळपास दोनशे मीटर अंतरावर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. ज्यामध्ये कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या शेकडो जनावरांची सुटका करण्यात आली.
पो.नि. मा.तिरुपती राणे माहिती देतांना☝️☝️
या घटनेने समस्त परिसरात खळबळ माजली आहे. एका खासगी मालकीच्या जागेवर तीन मोठे शेड तयार करून या जनावरांना अत्यंत वाईट परिस्थितीत डांबुन ठेवण्यात आले होते. या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी व बैल या जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलीसांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली आणि सर्व जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलीसांनी जवळपास शंभराहून अधिक जनावरांना मुक्त केले आहे. हे जनावर कत्तलखान्यात नेण्याची तयारी होती, मात्र पोलीसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची सुटका झाली.
जनावरांच्या सुटकेनंतर त्यांची तात्पुरती व्यवस्था सध्या गोशाळांमध्ये करण्यात आली आहे.या प्रकरणात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तिरुपती राणे यांनी न्यूसजप्रभात ला माहीती दिली की,आम्हाला विश्वसनीय स्रोतांकडून गोपनीय मिळाली होती आणि आम्ही तात्काळ पथक तयार करून कारवाई केली. जनावरांना वाचवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट होते.स्थानिक लोकांनी छापेमारी केल्याने पोलिसांचे कौतुक केले असून, जनावरांची कत्तल थांबवून त्यांना मुक्त केल्याबद्दल आभार मानले आहेत. या घटनेनंतर जनावरांच्या तस्करी आणि कत्तल करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांकड़ून मुक़्या जनावरांची तस्करी व कत्तल करणाऱ्या टोळीविरोधात कठोर पाऊल उचलण्याची मागणी देखील होत आहे.