MIS Coordinator चे तांत्रिक मार्गदर्शन ठरले मोलाचे
गोंदिया(दि.२२सप्टेंबर) : यु-डायस (Unified District Information System for Education) ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे संपूर्ण भारतात इयत्ता १ ते १२ वी पर्यंत शाळांची इतंभूत माहिती संकलित करण्याचे काम केले जाते. दरवर्षी प्रत्येक शाळेला या प्रणालीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती इत्यादी ऑनलाईन नोंदी कराव्या लागतात. आणि संपूर्ण वर्ष ह्या संकलित माहितीचा उपयोग विविध ठिकाणी केला जातो. म्हणूनच Udise ला शाळेचा हृदय म्हणून संबोधने वावगे ठरणार नाही. अश्या या अतिमहत्वाच्या शिक्षण प्रणाली मध्ये संपूर्ण राज्यात सर्वप्रथम माहिती पूर्ण करण्याचा मान गोंदिया व आमगाव तालुक्याने पटकाविला असून दोन्ही तालुक्याच्या udise चमूने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे . गोंदिया चे गटशिक्षणाधिकारी प्रदीप समरीत तथा आमगाव चे गटशिक्षणाधिकारी आर. पी. रामटेके यांचे त्यांच्या स्वतालुक्याला लाभलेले मार्गदर्शन आणि श्रीकांत त्रिपाठी, MIS Coordinator गोंदिया, सुशिलकुमार खापर्डे MIS Coordinator आमगाव, यांचा तांत्रिक हातखंडा तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे कार्य वेळेआधी पूर्ण होऊ शकले. दिलेल्या मुदतीच्या आधीच udise चे काम पूर्ण करणे हे एक आव्हानच होते परंतु संपूर्ण राज्यात गोंदिया व आमगाव तालुक्याने बाजी मारली ही उल्लेखनीय बाब आहे.
प्रदीप समरीत, गटशिक्षणाधिकारी गोंदिया , आर. पी. रामटेके गटशिक्षणाधिकारी, आमगाव, विनोद परतेके, गटसमन्वयक ग. सा. के. गोंदिया तथा सुनील बोपचे गटसमन्वयक ग. सा. के. आमगाव यांनी सर्व शाळांचे व शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.