शासकीय योजनांमुळे महिला स्वावलंबी : परिणती फुके

0
1055

आमगाव येथे भाजपा महिला आघाडीचा मेळावा

आमगाव : गोरगरीब महिला आत्मनिर्भर व्हाव्या, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. राज्य सरकारने क्रांतिकारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याने विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही योजना फसवी नाही, ती दीर्घकाळ चालेल, माता-भगिनींनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, सरकारच्या योजना महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या आहेत, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिणती फुके यांनी केले.
त्या भाजपा महिला आघाडी आमगाव येथे २२ सप्टेंबर रविवार रोजी फार्मशी काँलेज रिसामा येथे आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जीप अध्यक्ष विजय शिवनकर होते तर उदघाटन भाजपा गोंदिया जिल्हा अध्यक्ष अँड येशुलाल उपराडे यांनी केले मेळाव्याला माजी आमदार संजय पुराम, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम,तालुका अध्यक्ष राजेंद्र पटले, नगर अध्यक्ष पिंटू अग्रवाल विधान सभा विस्तारक देवचंद नागपुरे, जिला सचिव सुरेश कोसरकर, नरेंद्र बाजपेयी, राकेश शेंडे, उमेश राहांगडाले अंजली जांभूळकर, संगीता वाटकर, ज्योति  वाढई, आदींची उपस्थिती होती.
परिणती फुके म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. राष्ट्र विकासात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून त्या आत्मनिर्भर व स्वावलंबी होणे गरजेचे असत्याचे त्या म्हणाल्या. जात/पात, नात्यागोत्याचा नाही तर भाजपा समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत असल्याचे संजय पुराम यांनी सांगितले.
सविता पुराम यांनी, प्रास्ताविकातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर प्रकाश टाकत योजना निरंतर चालणारी असून वंचित महिलांना नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा मानकर यांनी केले आभार.सुषमा भुजाडे यांनी मानले कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होते.