मागील दहा वर्षात कोरची तालुकाचा विकास जलद गतीने..

0
217

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील स्व: घोषित उमेदवार यांनी कितीही युती सरकारविरुद्ध अपप्रचार करत असले तरी…कोरची तालुक्यातच नाही..! तर महाराष्ट्रात व देशात ही युती सरकारने विकासाचे पाऊल जलद गतीने टाकलेला आहे.तालुक्यात अनेक समस्याचे निराकरण मागील दहा वर्षात झालेले आहे. तालुक्यातील कनेक्टीविटी ची समस्या रस्ते जोडून जवळ -जवळ पूर्ण झालेले आहे.बेतकाठी ते बोरी रस्ता, कोरची ते बेतकाठी रस्ता, बेडगांव ते बोरी रस्ता,बेडगांव घाट ते सातपुती रस्ता, कोरची ते जांभळी रस्ता मसेली ते कोटरा रस्ता, कोसमी 1ते सोनपूर रस्ता, नांदळी जैतनपार ते हेटाळकसा रस्ता, टेमली रस्ता, बिहीटेकला ते कोटरा रस्ता,बडीमादे ते कोसमी नं 2 रस्ता,नागपूर ते अरमूलकसा रस्ता,देऊळभट्टी पाटीलटोला ते गोटाटोला रस्ता, व मोठा पूल, अलोंडी ते रानकट्टा रस्ता, व मोठा पूल, कोटगुल ते खसोडा रस्ता, व मोठा पूल, कोटगुल ते वाको रस्ता,नांगपूर ते अंतरगाव रस्ता, ग्यारापती ते मोठा झेलिया रस्ता, हे सर्व रस्ता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण झालेले आहेत, तसेच अजूनही बरेच रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, ठिकठिकाणी बरेच गावात माननीय आमदार साहेब यांच्या फंडातून सभागृहाचे काम, नाली बांधकाम सीसी रोड, झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे, अंगणवाडी बांधकाम असो,शाळा दुरुस्तीचे बांधकाम असो असे बरेच विकासात्मक काम झालेले,आपल्याला कोरची तालुका दिसून येते, तसेच इंटरनेटच्या सुविधा असो, विजेचे समस्या दूर करण्यासाठी ढोलडोंगरी येथील 33 केव्हि सबसेंटर असो, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत विहीर शेततळे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी हेक्‍टरी 20 हजार रुपये, वर्षाला पी एम किसान योजनेअंतर्ग सहा हजार रुपये, महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये असे एकूण वर्षाला बारा हजार रुपये, मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना महिण्याला पंधराशे रुपये, चे अनेक योजना लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी केंद्रातील व महाराष्ट्रातील युती सरकारांनी मागील दहा वर्षात काम केलेले आहेत…

_#संकल्प विकासाचा.._

सबका साथ, सबका विकास.. सबका विश्वास, और अब सबका प्रयास.. हमारे हर लक्ष्यों की प्राप्ती के लिए बहुत ही महत्वपूर्ण है |

_#एक भारत, श्रेष्ठ भारत, युवाओ का भारत _

श्रीमती, गिरीजा कोरेटी ( माजी सरपंच ग्रामपंचायत नांगपूर )

Previous articleशासकीय योजनांमुळे महिला स्वावलंबी : परिणती फुके
Next articleअहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले