वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-22 सप्टेंबर 2024
देवळी येथील युवकाचा काल मध्यरात्री औरंगाबाद वरून परत येत असताना उभ्या ट्रकला धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. देवळी येथील रहिवासी निखिल साठोणे वय (26) वर्ष हा तरुण युवक औरंगाबाद येथील मेडिकल क्षेत्रात एम आर चे क्षेत्रात कार्य करीत होता. औरंगाबाद वरून तो देवळीकरिता अनुराग ट्रॅव्हल्स ने प्रवास करीत होता. रात्री एक दीडच्या दरम्यान नांदेड रोडवर नादुरुस्त ट्रक क्र. MH-26-BE-8612 हा चा टायर फुटल्यामुळे बदलत चालक आणि कंडक्टर टायर बदलवण्याकरिता ट्रकला जॅक लावत होते. इतक्यातच भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने ट्रकला जोरदार धडक दिली. धडक दिल्यामुळे ट्रक दहा ते बारा फूट समोर गेला, धडक इतकी जोराची होती की ट्रक चा क्लिनर ट्रकच्या टायरमध्ये फसला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचा चालक थोडक्यात बचावला. ट्रकला मागून धडक दिल्यामुळे ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरशः चकनाचुर झाला. ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये बसलेला ट्रॅव्हल्सचा कंडक्टर आणि मागे बसलेला निखिल साठोणे याला जबर मार लागला. स्थानिक लोकांनी ॲम्बुलन्स बोलून दोन्ही जखमींना आर्णी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. निखिल ला जबर मार लागल्यामुळे अपघातात निखिल साठोणे याचा सुद्धा मृत्यू झाला. ट्रॅव्हलचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नांदेड पोलीस करीत आहे.

