गोंदिया /धनराज भगत
नागझिरा जंगलाचा राजा टी-९ अनंतात विलीन झाला आहे.टी-९ उर्फ़ बाजीराव वयाच्या १२ व्या वर्षी क्षेत्र झुंजीत (Territorial Fight) आज मृत पडला.टी-९ हा नर वाघ मूळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. माहे डिसेंबर-२०१६ मध्ये हा वाघ ताडोबा वरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल ९ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र आज दुसऱ्या नर वाघासोबत झालेल्या झुंजीत नैसर्गिक रीतीने तो मरण पावला. एक पर्व संपले…!
Yellow Alert पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; आठ दरवाजे उघडले

