
गडचिरोली /प्रतिनिधी
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे दिनांक १७/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ दरम्यान राबविण्यात येणा-या स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवित परिसराची स्वच्छता करण्यात आली . प्लास्टिक मुक्त परिसर निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांव्दारे स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ एस एन बुटे,प्रा. डाॅ सुधीर भगत, प्रा. डाॅ बाळकृष्ण कोंगरे, प्रा. विनोद पत्तीवार, प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकर, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डॉ शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ राजीव डांगे, प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार, प्रा. चिन्ना पुंगाटी प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डाॅ साईनाथ वडस्कर, प्रा. अतुल बारसागडे आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ संदिप मैंद यांनी केले.


