ठाणा व भजियापार येथे प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0
450
1

आमगांव : सरोज कावळे

दिव्यांग, निराधार, शेतकरी, कामगार, अनाथ व जनसामान्यांचे कैवारी संस्थापक प्रहार व दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष मा. आमदार बच्चू कडू यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचविन्यासाठी व पुढील काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लक्षात घेता प्रहार संवाद यात्रा अंतर्गत आ.बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराशी प्रेरित होत दि.२२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी ठाणा येथे महिला शाखा व प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित, कार्यक्रमाचे अध्यक्ष, महेंद्र भांडारकर, (प्रहार जिल्हा प्रमुख गोंदिया) उद्घाटक, महेंद्र नंदागवळी, (प्रहार गोंदिया जिल्हा सचिव) सह उद्घाटक. प्रदीप निशाने (तालुका प्रमुख तिरोडा) लक्ष्मीबाई साठवणे (शाखा अध्यक्ष) दुर्गाताई धुर्वे (शाखा उपाध्यक्ष) किरण ताई बडवाईक (शाखा सचिव) गिताबाई वानखडे (शाखा सहसचिव) प्रतिभा सोनसाटी, मीनाक्षी कावळे, ममता भिलावे, वंदना ओरसे, ममता जोशी, जमनी ताई मानकर, शोभाताई गणवीर, ज्योती भेलावे, ज्योती भोयर, दुर्गा तुमसरे, व असंख्य कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.


तसेच पक्ष मजबूती उद्दीष्टाने भजियापार येथे प्रहार शाखेचे उद्घाटन करण्यात आले.उपरोक्त कार्यक्रमात प्रहार शाखेचे पदाधिकारी गावातील गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.