दुर्गा – शारदा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी रीतसर परवानगी घेणे आवश्यक – पो. नि. तिरुपती राणे

0
400

पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस पाटील व शांतता समितीची बैठकीचे आयोजन 

आमगाव : तालुक्यात आगामी काळात साजरे होणारे दुर्गा व शारदा सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी केले आहे.
पोलीस स्टेशन आमगाव कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ही बैठक पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली.
आमगाव तालुक्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे. तालुक्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात तालुक्यात साजरे होणारे सण हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत असे मत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले.
तसेच येणारे दुर्गा व शारदा हे उत्सव साजरा करण्याकरिता मंडळांनी रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे हे उत्सव शांततेत पार पाडावे जेणे करून या उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये त्याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीचे संचालन महिला पोलीस हवालदार सत्यशीला छिपे यांनी केले तर आभार सुरेंद्र लांजेवार यांनी मानले
यावेळी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदेवरी येथे 27 सप्टेबंरला भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा
Next articleके के इंग्लिश स्कूलची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरीता निवड