आमगांव : के के इंग्लिश स्कूलच्या विजयरथाची गती व प्रगती दिवसेंदिवस वाढत असून नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत के के इंग्लिश स्कूल च्या 14 वर्षीय मुले व मुलीच्या संघांनी विजय नोंदवित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले. ह्या स्पर्धेत जवळपास ८० संघांनी सहभाग नोंदविला होता. पण आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर के के इंग्लिश स्कूलच्या खेळाडूनी विजयश्री आपल्या नावावर केली.
खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर व कार्यकारी डॉ संघी सर, मुख्याध्यापिका रिना भुते मॅडम, व आई वडिलांना दिले. शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी खेळाडूना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

