

अपंग,वृद्ध,रुग्ण,आणि गरोदर महीला प्रवाशांची गैरसोय…
न्यूजप्रभात / धनराज भगत
आमगांव : रेल्वे विभागाने देशातील जीर्ण रेल्वे स्थानकांचे कायापालट करण्याच्या उद्देशाने नवीन आर्किटेक्ट प्रणालीनुसार आमगांव रेल्वे स्थानकाचे पादचारी पुल (FOB) सन २०२० ते २०२२ दरम्यान कोरोनाच्या काळात स्थानिक रेल्वे स्थानकावर ०८ जिन्याच्या पादचारी पूल बांधण्यात आलेला आहे.अशा परिस्थितीत प्रवाशांना नागमोड़ी व लांबचा प्रवास करून रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपरोक्त रेल्वे स्थानकावरुन आमगांव,देवरी,व सालेकसा तालुक्यासह सिमेलगतचे मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून शेकडो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणाहून मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक, रुग्ण, गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिक, महिला आदी रेल्वे प्रवासी येतात. पादचारी पूलावरून रेल्वे प्लेटफार्मवर जाण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात.या भीषण जिन्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना या वेळी शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. असा पादचारी पुल किवा जिना बांधल्यावर, प्लॅटफॉर्मवर जाण्या- येण्या साठी स्थानकांच्या दोन्ही बाजूला ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध करून देने गरजेचे आहे, जेणेकरून प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. ह्या रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना जीव धोक्यात घालण्याशिवाय प्रवाशांना दुसरा पर्यायच उरला नाही. रेल्वेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान दिव्यांग व वृद्धांसाठी दखल घेऊन योग्य ती व्यवस्था करायला हवी होती.
छोट्या रेल्वे स्थानकांवर रेल्वे विभागाचे दुर्लक्ष
यापूर्वी पादचारी पुलाच्या संदर्भात रेल्वे विभागाला त्रस्त नागरिक, सामाजिक संघटना आणि डी आर यु सी सी सदस्यांनी रेल्वे मंत्रालय आणि गढ़चिरोली/चिमूर व गोंदिया/भंडारा लोकसभा प्रतिनिधी यांना वारोंवार पत्रव्यवहार व निवेदने दिले असून सुद्धा आज तगायत कोणतीही दखल वा अंमलबजावणी झाली नाही.
केंद्र सरकार ने रेल्वे मंत्रालयाला दिलेली जवाबदारी उपरोक्त विभाग योग्य अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येते.अशी जनमानसात चर्चा आहे.
सदर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला एकूण आठ जिने असून, त्या नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आल्या आहेत, नागमोडी बांधकामामुळे पादचारी पूल नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आमगाव व परिसरातील नागरिकांकड़ून विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर व रेल्वे महाव्यवस्थापक,बिलासपूर यांना केली आहे.
“आमगाव रेल्वे स्थानकाचे बांधकाम हे अतिशय स्तुत्य काम आहे.मात्र एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर चढण्या उतरण्यासाठी ज्या पद्धतीने पादचारी पुल बांधण्यात आल्या आहेत, वृद्ध, गरोदर महिला आणि अपंग व्यक्तींसाठी आवागमन सुविधा अजिबात योग्य नाही.अशा परिस्थितीत रेल्वे विभागाने ‘ई-रिक्षा’ ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.या प्रश्नावर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल.”
– रितेश अग्रवाल (DRUCC सदस्य, नागपूर विभाग)






