उद्या अहेरीत सुप्रसिद्ध भीम गायिका कडूबाई खरात यांचे कार्यक्रम,मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उदघाटन…

0
181

अहेरी –

फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच, अहेरी तर्फे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम गायिका कडुबाई खरात यांचे उद्या बुधवार 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता स्थानिक शंकरराव बेझलवार महाविद्यालयाच्या मागे , भव्य पटांगणावर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी बौद्ध समाज मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी अलोणे हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कृउबास अहेरीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, युवा नेते रामेश्वरराव बाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा पुष्पाताई अलोणे , माजी प्राचार्य तथा बोधीसत्व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन , आलापल्ली ग्रा. पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार आदी व अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.

कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे व कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजक सुरेंद्र अलोणे यांनी केले आहे.

Previous articleगॅस भरलेली पिकअपने विद्युत खांबाला दिली धडक… अनर्थ टळला…….आलापल्ली येथील घटना.
Next article28 सप्टेंबर रोजी आमगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन