जास्तीत जास्त नागरिक लोक अदालतीत उपस्थित रहा – न्यायाधीश एम. व्ही. जावळे यांचे आवाहन
आमगाव : उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आमगाव व वकील संघ आमगाव तसेच पंचायत समिती आमगाव व सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यमान दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे सदर लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या न्यायालयातील प्रलंबित खटले व दाखल पूर्व प्रकरणा संबंधित आढावा बैठक आज दि. 24 सप्टेंबर 2024 ला न्यायालयाच्या सभागृहात आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. जावळे यांनी उपस्थितांना दाखल व दाखलपूर्व प्रकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.नवीन फौजदारी कायद्याबद्दल कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे, चेक बाउन्सचे प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 गुन्हा कबुलीची प्रकरणे, इतर याशिवाय दाखलपूर्वक ग्रामपंचायत, नगरपंचायतचे टॅक्स प्रकरणे, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे थकीत देयकांबाबतची प्रकरणे ठेवण्यात येऊन त्यांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येतो. त्यावेळी दिवाणी न्यायाधीश एम व्ही जावळे यांनी आगामी लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणे व दाखल पूर्व प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा व लोक अदालतीच्या सुवर्णसंधीचा फायदा घेत नागरिकांनी जास्तीत जास्त न्यायालयातील प्रकरणांच्या निपटारा करावा असे आवाहन केले.
यावेळी सदर शिबीरामध्ये ए. आर. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, आमगांव तसेच वकील संघ आमगांवचे अध्यक्ष एड. एस. डी. बागडे विधिज्ञ, वकील संघ आमगांवचे सचिव एड. के. जी. कठाणे विधिज्ञ, एड. आर. डी. लिल्हारे विधिज्ञ, एड. बी. एस. पाथोडे विधिज्ञ, सौ. एम. के. बहेकार विधिज्ञ, एड. व्ही. डी. रहांगडाले विधिज्ञ, एड. के. एम. लिल्हारे विधिज्ञ, एड. एम. बी. यादव विधिज्ञ, एड. एस. पी. सिहोरे विधिज्ञ, कु. प्रियंका बागडे विधिज्ञ, एड. सी. सी. राठी विधिज्ञ, एड. पी. पी. थेर विधिज्ञ व इतर वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचारीवृंद व पक्षकार उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास सफल करण्यास श्रीमती आशा ठाकरे (वरिष्ठ लिपीक) आणि पी. एस. फरकुंडे (प्रभारी सहाय्यक अधिक्षक) यांनी अथक प्रयत्न केले.