चला निर्धार करूया…… आंदोलनात सामील होऊया

0
209

25 सप्टेंबर 2024 च्या आंदोलनात सर्वांनी सामील व्हावे यासाठी समन्वय समितीच्या वतीने माध्यमातुन आपणास आवाहन कऱण्यात आलेले आहे , सध्याची शैक्षणीक परिस्थिती बघता आणि दिवसागणिक निघणारे शासन निर्णय, नानाविध अशैक्षणिक कामे, कंत्राटी करणाचा थाट या सर्वांना जर लगाम लावायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावच लागेल.

कोण सहभागी होणार हे म्हणण्या पेक्षा मी सहभागी होणार आंदोलनात जाणार असं म्हणुन सर्वांनी १००% साथ सहभागी होवून आंदोलन यशस्वी करुन सरकारला जागे करूया.

व्हॉटसअपच्या जमान्यात फक्त online संघटना न चालवता हेड टू हेड काम करणारे सरकारच्या या जुलमी GR ला विरोध नाही केला तर गरिबांचे शिक्षण संपेल या विचारांचे………तसेच या GR ला विरोध केला नाही तर शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला जाईल म्हणून माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या हाडा मासांत लढण्याचे बळ निर्माण करणारे श्री विजय कोंबे सर यांना सलाम.

सेवानिवृतिला अवघे 6 महिने शिल्लक असताना अनेक शिक्षक बांधव रस्त्यावरील लढाईत आमच्या अस्तित्वसाठी उतरायला तयार असतील तर आम्ही गप्प बसायचे का?????

आपल्या अस्तित्वासाठी, शाळांच्या अस्तित्वासाठी,गोरगरिबांच्या शिक्षणासाठी 25 सप्टेंबरच्या महामोर्चात सर्वांनी सहभागी होऊयात.

एन.बि.बिसेन,                                                 तालुका समन्वय समिती आमगाव.

Previous articleराष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या – खासदार डॉ नामदेव किरसान
Next articleए आय पटेल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची “वानस्पतिक यात्रा”(Botanical tour) संपन्न