ए आय पटेल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची “वानस्पतिक यात्रा”(Botanical tour) संपन्न

0
296

आमगांव : बोटॅनिकल गार्डनमध्ये जिवंत वनस्पतींचा संग्रह असतो. ही संग्रहालये वैज्ञानिक संशोधन, संवर्धन, प्रदर्शन आणि शिक्षणासाठी तयार केली असतात. यामध्ये फुले, झुडपे, झाडे यांसारखी झाडे ठेवण्यात आली असतात. याप्रकारे तालुक्यातील ए. आय. पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी  “वानस्पतिक यात्रा”(Botanical tour)  दरम्यान दि.२२ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हयातील प्रसिद्ध बोदलकसा जलाशय /जंगल परिसराला भेट दिली.

या यात्रेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे हर्बेरियम नमुना शीटवर वनस्पतींच्या नमुन्यांचा संग्रहा साठी असून  पद्धतशीरपणे संग्रहित करण्याच्या आणि संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाळलेल्या वनस्पतींच्या नमुन्यांची माहिती मिळावी या उद्देशाने जंगल भ्रमन करून वनस्पति संकलन करण्यात आली. 

विद्यार्थ्याना संस्थापक एम एम मेश्राम,प्राचार्य एम बी रहांगडाले,प्रा.पी. एम. बोंबर्डे, यांनी मार्गदर्शन केले तर एम बी बिसेन ,एल जी हेमने  व्ही व्हीं बागडे, अनमोल मेश्राम,  मेंढे सर, वहाने मैडम, बोरकर मैडम नागपुरे सर,बिसेन सर तुरकर सर या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

 

Previous articleचला निर्धार करूया…… आंदोलनात सामील होऊया
Next articleBE, MBBS सह व्यवसायिक शिक्षणासाठी, ओबीसींकरीता उत्पन्न मर्यादेची अट रद्द