जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा

0
395

आमगाव : जगभरात लाखो फार्मासिस्ट दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करतात . जगभरात फार्मसी व्यवसायाचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी सुद्धा श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी आमगाव व गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला.

फार्मासिस्ट डे सेलिब्रेशनच्या निमित्ताने, कॉलेज च्या वतीने जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. या जनजागृती रैली मध्ये डी फार्म व बी फार्म चे २०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच शिक्षक वृंद, मेडिकल असोसिएशन चे फार्मासिस्ट, ग्रामीण रुग्णालय चे कर्मचारी पण सहभागी झाले होते. या फार्मासिस्ट डे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाचे उपाध्यक्ष रुपेश तिवारी हे होते. भवभूती शिक्षण संस्था चे संचालक ललित मानकर, प्रभारी प्राचार्य डॉ तुलसीदास निंबेकर,औषधी विक्रेता संघ तालुका अध्यक्ष नरेंद्र बहेटवार, अंशू कामडी फार्मासिस्ट ग्रामीण रुग्णालय आमगाव, प्रदीप नागपुरे, महेंद्र तिवारी, इत्यादी उपस्थित होते.
जनजागृती रॅलीला भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक ललित मानकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रैली काढण्यात आली.
श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ डी के संघी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक दीक्षा खोब्रागडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, रोशनी अग्रवाल, जितेंद्र शिवणकर, परमेश्वर वानखेडे, चेतन बोरकर, दीपिका बोपचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

Previous articleBE, MBBS सह व्यवसायिक शिक्षणासाठी, ओबीसींकरीता उत्पन्न मर्यादेची अट रद्द
Next articleभाजप कार्यालय तुमसर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न