रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांनी हाक देताच पोहचल्या. माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, सुटके नंतर घेतला प्रवाशांनी मोकळा श्वास..

0
204

अहेरी.तालुक्यातील बहुतांश रोड अत्यंत दुर्दैवी अवस्थेत आहे. या मार्गावर दोन वर्षापासून बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे स्वातंत्र्याच्या काळापासून अद्यापही कुठे-कूठे तर बस पोहोचलेली सुद्धा नाही रस्त्याच्या बेहाल मुळे बसेसचे पण बेहाल झालेले आहे. अनेक बस भंगार अवस्थेत पडलेले आहे तरी प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे जिमलगट्टा, देचली मार्गे जाणारी राज्य महामंडळाची बस सिरोंचा फाटा आलापल्ली नाल्याजवळ दीड तासापासून बिघडलेल्या अवस्थेत होती. ही बाब भाग्यश्री आत्राम यांना कळताच अहेरी आगाराशी संपर्क साधून तात्काळ बस ची सुविधा करून स्वतःघटनास्थळी जाऊन प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच लहान लेकरांना बिस्केटचा वाटप केल प्रवाश्यांना सुटकेचा श्वास घेतला या पुढेही सुद्धा मदत लागल्यास निश्चितपणे हाक द्या असे भाग्यश्री आश्रम यांनी म्हणाले. या वेळी सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास विरगोनवार,नगरसेवक अमोल मुक्कावार,आलापल्ली ग्रा.प.सदस्य स्वप्नील श्रीरामवार,युवानेते अनुराग बेझलवार, युवानेते सुमित मोतकूरवार,संदीप येमनूरवार, शैलेश गेडाम, संतोष यमुलवार व मोठ्या संख्येने प्रवाशी उपस्थित होते.