आमगांव : पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी केंद्र अंजोरा पंचायत समिती आमगाव या शाळेच्या “मुख्यमंत्री माझी -शाळा सुंदर शाळा “स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला. शाळेची भौतिक सुविधा व गुणवत्ता या आधारावर सदर मूल्यांकन करण्यात आले. आणि या मूल्यांकनामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत बाम्हणी जि. प.शाळेने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करून सलग यावर्षी दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी या शाळेच्या प्रथम क्रमांक आलेला होता .तरी अशीच प्रगती शाळा करीत आहे.
या यशामागे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत ,सर्व पालक वर्ग आणि सर्व शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. गावचे सरपंच सुभाष थेर,उपसरपंच उषा राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रसिला भेदे ,उपाध्यक्ष दमयंता नागरिकर, पोलीस पाटील शिला रहिले ,तंटामुक्ती अध्यक्ष देवराज धावडे , जनार्दन शिंगाडे , उषा बिसेन, डीलेश्वरी ठाकरे ,सुनिता दोनोडे ,धनश्री आग्रे, पल्लवी विठ्ठले, देवांगना उपरीकर ,प्रतिमा भेदे, राजेश रहिले, यादवराव ठाकरे, भेजलाल पटले, मनीष बावणे, सुभाष श्यामलाल थेर, भुमेश मडावी,ईश्वर धावले, भागरता भेदे, गीता बावणे,शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम, शाळेचे सहायक शिक्षक एम .टी जैतवार ,पुष्पा गौतम व गावातील तरुण मंडळी यांचा महत्वाचा योगदान आहे .

