अहेरी:राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अविस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) जाहीर प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या परिसरात केलेले विकास काम, विकासात्मक कामासाठी खेचुन आणलेली निधी,तरुणांना लाजवेल असा उत्साह व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आविस पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे. बुधवार (२५) सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील मांड्रा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दुमाडगु येथील सुधाकर आत्राम ग्राम. पं. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत केले आणि पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबूराव तोर्रेम, बालाजी गावडे, राकेश पन्नेला माजी. पं.समिति सदस्य अहेरी, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, संतोष चैतू आत्राम, येडका आत्राम, बिच्छू आत्राम, पांडू आत्राम, चिनू आत्राम, बोर्रा तलांडी, करपा कुसाराम, मल्लेश गावडे, आदी उपस्थित होते.