गोंदिया : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांनी दि २६/०९/२०२४ रोजी मुंबई येथील आझाद मैदानात चतुर्थ श्रेणी च्या मागणीसाठी पुकारलेल्या लक्षवेधी आंदोलनात महराष्ट्रातील तमाम कोतवाल बांधव आपल्या परिवाराची पर्वा न करता आज मुलबाळासह परिवार घेऊन घेऊन उतरलेले आहेत.
आज इंग्रज कालीन कोतवाल पद असून तलाठ्याच्या अधिनस्त असलेला महसूल विभागातील महत्वाचा समजला जाणारा २४ तास काम करणारा कर्मचारी आहे. आज महसूल विभागातील सर्वच कामे जसे निवडणूक, लाडली बहिण, नैसर्गिक आपत्ती, शासकीय वसुलीचे काम, शासनाच्या कितीतरी योजना तसेच रात्रपाळी असे कितीतरी महसूल विभागातील कामे कोतवाल याच्या हातून करून घेतले जाते. परंतु शासनाकडून कोतवालाला नेहमी उपेक्षाच मिळाली आहे. आज कोतवाल यास पंधरा हजार रुपय मानधन दिले जाते. आज शासकीय कर्मचारी म्हणून कामासाठी अधिकारी लोक विविध कामाचे आदेश काढतात आणि आपली कामे करून घेत्तात आणि शासन स्तरावर म्हटले जाते की कोतवाल यास काही कामे नाही. या सर्व कामाचे पुरावे शासन स्तरावर देण्यात आले आहे तरी सरकार चतुर्थ श्रेणीपासून नेहमी वंचित ठेवत आहे. शासन म्हणते की निधी नाही शासनाकडे फालतू कामासाठी निधी आहे व जो कर्मचारी शासनाची नेहमी निष्ठा व भरोस्याचे काम करते त्यास देण्यास पैसे नाही ही फार शोकांतिका आहे. तिकडे मुंबई येथे आझाद मैदानात आमचे कोतवाल बांधव मोठ्या संख्येने कामबंद आंदोलनात सहभागी आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण कोतवाल बांधव आज जो पर्यंत श्रेणी चे शासन काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद धरणे आंदोलन करणार आणि शासनावर दडपण आणणार हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष महादेव शिवणकर, जिल्हा संघटक घनश्याम पटले, महिला उपाध्यक्ष सरस्वता कुंभरे, कपिल हरडे, जितु टेभंरे, स्वाती घरडे सीमा कुरसुंगे, लंकेस बिसेन, संतोष बिसेन. नरेश करहाडे इत्यादी लोकांनी सहकार्य केले.

