*अहेरी:*- तालुक्यातील जिमलगठ्ठा येथे नुकतेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे जनसंवाद यात्रा होते, त्या दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) प्रवेश केले.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुपट्टा गळ्यात टाकून सर्वांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गटात)प्रवेश करणाऱ्यांमध्ये वसंत कन्नाके विभाग प्रमुख, अनिल आत्राम उपविभाग प्रमुख, मदनय्या नैताम सर्कल प्रमुख, जहीर शेख शाखा प्रमुख, रवी पुथलवार, सागर तोरेम उपशाखा प्रमुख, विक्रम मद्देर्लावार युवा सेना, व्यंकटेश नैताम शिवसैनिक, प्रवीण मडावी, अरविंद पुथलवार, सूरज तोडसाम, हनमंतू नैताम , श्रावण नैताम, संदेश तोडसाम, अजय मडावी, संतोष कुळमेथे, प्रियंका वेलादी महिला आघाडी, आँचल कुसराम युवती सेना विभाग प्रमुख, श्रीमती मिसाल उपप्रमुख, आश्विनी आत्राम, सपना कुसराम, अंजली मडावी, पुष्पा सिडाम, श्रुती मडावी, राधिका वेलादी, लक्ष्मी सोयाम, शकुंतला नैताम, बिलाल शेख, असरार शेख, दीपक तोरेम, विठ्ठल नैताम, नारायण पुद्दलवार, सुशांत मडावी, श्रीनिवास वेलादी, अजय कन्नाके, कर्तिक मडावी, विकास वेलादी, जया कुळमेथे, सुंदराबाई वेलादी, निर्मला नैताम, बुचक्का नैताम, सिता वेलादि, अर्चना पुद्दलवार, शोभा पुद्दलवार, अक्कुबाई तोरेम, शालूबाई मडावी, सरिता मडावी , ललिता मडावी, नगमनी मडावी, छाया मडावी, सुनीता मडावी, यशोधा मडावी, रामबाई वेलादी, निलाबाई पदराम, रेणुका तोडसाम, अश्विन कुळमेथ, सुलोचना नैताम, पद्ममा पुपला, पद्मा सोयाम, अंजली मडावी, मोनिका कुळमेथ, सपना पनाटीवार, इरपे मडावी, पुष्पा येलकुचीवार, रजिता नैताम आदी शिवसैनिकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट)प्रवेश झाले.
ऐन विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अहेरी तालुक्यातील जिमलगठ्ठा व परिसरातील शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मजबूत बनले असून पक्षाला अजून नवी उभारी प्राप्त झाली आहे.

