*अहेरी* : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमाडगू येथील बंगाली बहुल भागात मतूआ मिशन आलापल्ली द्वारा श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर येथे कीर्तन व कथा कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे होते.त्यावेळी मतूआ मिशनच्याच्या सदस्यांनी त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यावेळी राजे साहेबांनी श्रीश्री.हरिगुरूचांद स्वामीचे पुष्प अर्पण करून दर्शन घेतले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना ‘सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो’ श्रीहरिगुरुचांद स्वामी चरणी प्रार्थना केली.तसेच तीथे उपस्थित भक्त जणांना मोलाचं मार्गदर्शन केले.
मोद्दूमाडगू येथील नवनिर्मित श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिरच्या जागे करिता राजे साहेबांनी 1 लाख 15 हजार रुपये आर्थिक मदत केल्याने. मतूआ मिशन आलापल्ली व श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर कमिटीच्या सदस्यांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.!
त्यावेळी मतूआ मिशन आलापल्लीचेचे अध्यक्ष निखिल मंडल,हरिदास हलदार,सुजय बच्छाड,जितेंद्रजी बिश्वास,सचिनजी बिश्वास, गणेश सिकदार, सदन मालाकार,सुकमल हलदार व भक्तगण तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.