
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नागरिक श्रीलंका येथे धम्म सहलीला महाबोधि टूर्स अँड ट्रॅव्हल्स अमरावती भंते तीस बोधी व बटरफ्लाय हॉलिडेज प्रीतम जीवतोडे व गौरव भगत यांच्या पुढाकारातून धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील सदरील धम्म सहलित बुद्धाचे दंतधातूचे दर्शन व इतर ऐतिहासिक 80 टक्के बुद्ध विहार बघायला मिळाले आहेत. श्रीलंका देश हा कृषीप्रधान असून वनविभागाने नटलेला आहे. श्रीलंका देशातील विशेष महत्त्व म्हणजे स्वच्छता व शाळेच्या संरक्षण भिंतीवर रेखाटलेले चित्र व रस्त्याच्या बाजूला मोठमोठे तथागत भगवान गौतम बुद्धांचे पुतळे तसेच तेथील लोकांचे परिधान केलेलं पांढरे शुभ्र वस्त्र भारतीयांना आकर्षण आहेत
आहे. जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याने तिथे बुद्धांच्या विहारातून त्याप्रकारची शिकवण व आचरण दिले जाते. स्वच्छतेला महत्त्व देणाऱ्या विचारांचे आचरण येथील लोक
करतात. तेथील प्रत्येक शाळांमध्ये प्रज्ञाशील करुणाचे संदेश मुलांना देऊन पंचशीलाने माणूस घडविण्याचा प्रयत्न शिक्षनातून केला जातो. विशेष म्हणजे २५०० वर्षांपूर्वीचे संघमित्रा व अशोक यांनी लावलेले वृक्ष तिथे अजूनही जिवंत आहेत. श्रीलंकेतील बौध्द संस्कृतीचा ठेवा जगाला मार्गदर्शक ठरेल असे मत जिल्ह्यातील पर्यटकांनी व्यक्त केले.


