सुरकुड़ा येथील कु.प्रणयाची उपजिल्हाधिकारी पदी निवड

0
6078

प्रणयाची पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीत भरारी….

गोंदिया : जिल्ह्यातील आमगांव तालुक्याच्या सुरकुड़ा येथील रहिवासी व कातुर्ली शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सोमकांत भालेकर यांची मुलगी कु प्रणया भालेकर यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड मिळवली आहे.
      त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासह आमगाव तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे.प्रणया यांनी आपल्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील तसेच समस्त समाजबांधवांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे.

प्रणया यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबियांचे, विशेषतः तिचे वडील सोमकांत भालेकर यांचे मोलाचे योगदान आहे. समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करून, प्रणया यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे.संपूर्ण आमगाव तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या यशाचे हार्दिक स्वागत केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Previous articleकेटीएस रुग्णालयात रेबिज प्रतिबंध व जनजागृती अभियान
Next articleनरसिंहपल्ली येथे जनसंवाद कार्यक्रमानिमित्त उसळला जनसागर..