आश्रम शाळा पुराडा येथे पालक मेळावा संपन्न
देवरी : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे नुकताच पालक मेळावा संपन्न झाला यावेळी मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संजय पुराम यांनी विद्यार्थ्यांना व आदिवासी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजचा युग हा स्पर्धेचा आहे आणि आजच्या युगात विद्यार्थ्यांना टिकायचे असेल यशस्वी व्हायचे असेल तर आदिवासी संस्कृती मधील नाचगाणा जेवढा महत्वाचा आहे तेवढाच वाचन करणे, अभ्यास करणे,नियमीत शाळेत उपस्थित राहणे हे महत्त्वाचे आहे, “नाचण्यापेक्षा वाचने महत्त्वाचे आहे” असे उद्गार यावेळी काढले.
पॅरेंटल इनवाॅलमेंट थ्रू मॅनेजमेंट कमीटी इन गव्हरमेंट आश्रम स्कूल अॅण्ड इएमआरएस या योजनेअंतर्गत दि.२५/९/२०२४ रोजी झालेल्या पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य कमल कापसे यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या मेमरी इनह्यांसमेंट,ब्रायटर माईंड,बोलका वर्ग, स्पोकन इंग्लिश,गुरुशाला उपक्रम तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन व विविध उपक्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येत असल्याचे सांगितले,ब्रायटर माईंड अंतर्गत विद्यार्थीच्या डोळ्याला पट्टी बांधून रंग ओळखने,एटिएम कार्ड वरील नंबर ओळखने अशाप्रकारचे प्रात्यक्षिके यावेळी पाहुण्यांसमोर दाखविण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणातून प्रकल्प अधिकारी श्री उमेश काशिद यांनी आदिवासी पालकांना विविध योजनांची माहिती दिली व कोणत्याही आदिवासी विद्यार्थ्याला किंवा पालकांला कसलीही अडचण असल्यास माझी प्रत्यक्ष भेट घेऊन सांगावे आम्ही आपल्याला विभागाकडून नक्कीच मदत करु असे आवाहन केले,या पालक मेळाव्यात प्रामुख्याने ढिवरीनटोलाचे सरपंच दिलीप जुळा,पुराडाचे सरपंच लक्ष्मीशंकरजी मरकाम, ढिवरीनटोला व पुराडा चे पोलिस पाटील शुभाष अंबादे,शा.व्य.समीती अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे, सालेकसा येथील पोलिस निरीक्षक भुषण बुराडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामकृष्ण येरणे, प्रा.आरोग्य केंद्र मुल्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ चेतना रहांगडाले,देवरीचे नायक तहसीलदार नामुर्ते साहेब,उपसरपंच भोजराज मडावी,गृहपाल विजय नवघरे, श्रीमती मंगलाताई वट्टी असे अनेक मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, जात प्रमाणपत्र तयार करणे, आयुष्यमान भारत कार्ड तयार करणे यांचा शिबीर आयोजित करण्यात आला होता,वन्यजीव हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षितता यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांवरील लैंगिक व इतर कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन, विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा एकसुत्रीपणा, शाळा व्यवस्थापन समितीत पालकांचा सहभाग व प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली,या कार्यक्रमात भरपावसात सुद्धा जवळ पास पाचशेच्या आसपास पालकांनी हजेरी लावली, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पालकांना, सर्व पाहुणे मंडळींना व सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदिप बिसेन,वर्षा सांगोळे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य कमल कापसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक प्रदिप पडवे, अधिक्षिका प्रिती रहांगडाले,प्रा.वैयजंती नेनावत,प्रा.वैशाली खोंडे,प्रा.मेघा धोपटे,प्रा.नितीन मेश्राम,प्रा.राजेश हट्टेवार,कु.सुजाता मेश्राम, विलास लिल्हारे,राजू भक्ता, मोरेश्वर धवने, भोजराज लंजे,सुरेखा कोरे,दुर्गा लांजेवार,प्रा.ओमप्रकाश मडावी,इतेश बारसे, दुर्गेश उईके, देवेंद्र हत्तीमारे, कुसुम दोनोडे, राजेश सांगोळे,मंदा देशमुख, प्रदिप होळी व सर्व शाळेतील कर्मचार्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

