*मुलचेरा:-* अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे आपल्या सामाजिक कार्यासाठी,आपल्या दानशूर वृत्तीसाठी तसेच प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत व संकटात सदैव तत्पर असा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत.
मूलचेरा तालुक्यातील स्थानिक नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.06 येथील रहिवासी असलेली सौ.शारदाबाई नानाजी कूळमेथे वय-56 वर्षे हे गेल्या अनेक महिन्यापासून कॅन्सर आजाराने ग्रस्त आहे.त्यांचं कुटूंब हे मोलमजुरी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात.ते अनेक दिवसांपासून बिमारीने त्रस्त असल्याने कुटूंबातील आर्थिक अडचणी दिवसेन-दिवस वाढत आहेत.कुटूंबाची परिस्थिती अंत्यत हलाकीची आहे.बिमारीचा उपचारा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने संपूर्ण कुटूंब व्यथित होत.
ही या कूळमेथे कुटूंबाची व्यथा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी तात्काळ कूळमेथे कुटूंबाला स्थानींक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देत.10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.
यावेळी नगरसेवक दिलीप आत्राम,गणेश गारघाटे, विजय गेडाम,दशरथ कन्नके, गुड्डू पल्लो,संतोष गेडाम, किशोर मडावी व कूळमेथे कुटूंबातील सदस्य तसेच स्थानिक राजे समर्थक उपस्थित होते.!!

