नागेपल्ली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश.

0
51

अहेरी:राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नागेपल्ली येथील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) जाहीर प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत सर्वांचे स्वागत केले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या परिसरात केलेले विकास काम, विकासात्मक कामासाठी खेचुन आणलेली निधी,तरुणांना लाजवेल असा उत्साह व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा राकॉ पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे.नुकतेच अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील जाकीर सय्यद यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकत पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले आणि पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.