

आमगाव : राष्ट्राचे भवितव्य विद्यार्थ्यावर अवलंबून असतो विकसित समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सहज सुलभ असते पण आदिवासी भागातील विद्यार्थी अशा मार्गदर्शनापासून नेहमीच वंचित राहतात. त्या वस्तू स्थितीची दखल घेऊन त्यांच्यासाठी युवा मराठी पत्रकार संघाच्या मार्फत देवरी येथे भव्य शिबिर घेण्यात आले.
यात देवरी तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
युवा मराठी पत्रकार संघ , हेल्पिंग ग्रुप व वनामी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे ही बाब नाविन्यपूर्ण व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे यावेळी माननीय राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. नित्यानंद जी झा, अप्पर पोलीस अधीक्षक देवरी, अतिथी मान. कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, मान. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, मान. डांगे साहेब पोलीस निरीक्षक देवरी यांचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले.
कार्यक्रमाप्रसंगी अतिथी व सत्कारमूर्ती मान. राहुल दुबाले हे पोलीस अधिकारी व पोलीस बंधू आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी सतत करीत असलेल्या कार्याबाबत उत्साह पूर्वक शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन संपादक (लोकतंत्र) मुकेश खरोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी स्व. श्रीमती जयश्री पुंडकर विदर्भा अध्यक्ष पोलीस बाईज संघटना यांच्या समाजोभिमुख केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा मरणोपरांत सत्कार करण्यात आला हे सत्कार त्यांचे पती संतोष पुंडकर, उपाध्यक्ष भवभूती रिसर्च ॲकॅडमी यांचे मान. कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी ,देवरी, मान. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेविका सौ. आरती जांगडे संपर्कप्रमुख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना देवरी तालुका यांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
देवरी येथे प्रथम आगमना प्रसंगी मान. राहुल भैय्या दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना व विदर्भ अध्यक्ष मान.आशुतोष चव्हाण यांचा संघटनेतर्फे राणी दुर्गावती चौकात भव्य स्वागत करण्यात आले. प्रथम राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला राहुल भैया दुबाले यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले. स्वागता प्रसंगी संतोष पुंडकर, राहुल वंजारी जिल्हाध्यक्ष गोंदिया, देवरी तालुका अध्यक्ष सुजित अग्रवाल, गोरेगाव तालुका अध्यक्ष सतीश वाघ, महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी मेश्राम, उपाध्यक्ष श्रीमती सविता गिरी , श्रीमती आरती जांगडे संपर्कप्रमुख,श्रीमती वंदना बैस, सचिव आमगाव तालुका, सीमा मळावी, शर्मिला टेंभुरकर, ललिता रामटेके, सरिता कावळे, किरण चौधरी, श्रीमती बावनथडे, अरुण आचले, विश्राम सलामे, दिलीप जुडा, सचिन भांडारकर, किशोर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
विश्रामगृह देवरी येथे महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी स्वर्गीय श्रीमती जयश्री पुंडकर यांच्या छायाचित्राला माल्या अर्पण करून मान. राहुल भैया दुबाले, संतोष पुंडकर, आशुतोष चव्हाण आणि उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.
संघटना वाढीसाठी आता जोमाने प्रयत्न करावे लागेल व आपल्या भागातील पोलीस व पोलीस परिवाराच्या समस्या जाणून घ्या व माझ्याकडे पाठवा शासन दरबारी समस्या निकाली लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल असे संघटनेच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांनी सांगितले. तसेच देवरी सारख्या लहानशा ठिकाणी होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे भव्य आयोजन केल्याचा मला खूप आनंद झाला अशी ही भावना यावेळी व्यक्त केली.


