गडचिरोली /अमोल कोलपाकवार
आलापल्ली येथे रविवारी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आलापल्ली येथे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे स्वागत आदिवासी पारंपरिक नृत्य ढोल ताशांचा गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने सार्वजनिक विश्राम गृह पासून ते क्रीडा संकुल पर्यंत भव्य रॅली काढुन करण्यात आला. क्रीडा संकुल येथे भव्य असे सभा मंडपात हजारो संख्यात ५ ही तालुक्यातील जनता उपस्थित होती. या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी भाषणातून अनेक नेत्यांवर टीका केली. काका पुतण्या एकीकडे आणि आम्ही एकीकडे…या भागात आरोग्य सेवा खालावली आहे या परिसरातील पेशंटला खाटेवर आणावे लागते अशी परिस्थिती या भागात आहे हे सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात आता राजघराण्यातून सत्ता काढायची आहे. आमच्या काँग्रेसला सीट मिळाली तर या भागाचा नक्कीच विकास होऊ शकते एकीकडे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दिले आणि दुसरीकडे एका लिटरच्या खाद्य तेल मागे 35 रुपये वाढ केली कसली लाडकी बहीण योजना असे टोमणे मारले.एवढेच नव्हेतर येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. या भाषणामध्ये खासदार डॉक्टर नामदेव किरसाण म्हणाले आम्ही बारा हजार मताधिक्यांनी जिंकून आलो होतो त्यामुळे या भागातला आमदाराचा सीट चा दावा काँग्रेसचा आहे या राजघराणे ही सीट सोडण्यास तयार नाही मागच्या तीन वर्षापासून आष्टी ते अल्लापल्ली रोड चे दयनीय अवस्था झालेलीआहे संपूर्ण तालुक्यातील रस्ते खराब झालेले आहे मी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित केले या भागातील रोड रस्त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले नितीन गडकरी यांना सुद्धा भेटलो आलापल्ली विश्रामगृहामध्ये नॅशनल हायवे विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून कुठले अडथळे निर्माण होत असेल तर मी सहकार्य करणार असे सांगितले आमचा उमेदवार निवडून आणणार हे नक्की. अजय कंकडालवार म्हणाले.आजच्या जनसमुदाय रोजी ने आणलेले नाही हे काँग्रेस प्रेमी आहेत या भागात काँग्रेसला दाबण्याचे प्रयत्न हे राजघराणे करत आहे आम्हाला काँग्रेसचा उमेदवार द्यावा आम्ही शंभर टक्के निवडून आणणार. या सभेत विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार,खासदार डॉक्टर नामदेव किरसाण,माजी जि.परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, हनुमंत मडावी,माजी आमदार पेंटा रामा तलांडी, सगुना तलांडी,कविता माहुरकर, महेंद्र ब्राह्मणवाडे, सोनाली ताई कंकडालवार, मुस्ताक हकीम,अजहर पठाण,अरुण बेझलवार,अशोक आईंचवार, प्रशांत आईंचवार, बनाय्या जंगम काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.