शाहीर सीमा पाटील यांचे जल्लोषात कार्यक्रम संपन्न..

0
108

*अहेरी:*- अभिनेत्री व सुप्रसिद्ध शाहीर सीमा पाटील यांनी शिव, फुले, शाहू, बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके या व अन्य महापुरुषांच्या जिवनपटावर कलेतून प्रकाश टाकले.

धर्मराव बाबा आत्राम मित्र परिवार व नारायणन आय. ए. एस.अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक वासवी सभागृहात ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. यावेळी रंगमंचावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, हर्षवर्धनराव बाबा आत्राम, बबलु भैय्या हकीम, रवींद्र वासेकर, पुष्पाताई अलोणे, रियाज शेख, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सुरेंद्र अलोणे, सुनील दहेगावकर, डेव्हिड बोगी, नागेश मडावी , डॉ. अतुल परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शाहीर सीमा पाटील आणि संगीत निर्माता दिग्दर्शक जॉली मोरे यांनी सांस्कृतिक व कलात्मक प्रबोधनाच्या माध्यमातून अभिनय करून महापुरुषांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले. वेशभूषेतून अक्षरशः महापुरुष अवतरले असे देखावा सुद्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

कार्यक्रमाच्या अखेरच्या क्षणी महापुरुषांच्या गीतांवर शाहीर सीमा पाटील यांनी सर्वांना रिझविले, कित्येकांनी नृत्याचा ठेका धरले आणि जागच्या जागेवर थिरकले. यावेळी मोठयासंख्येने प्रेक्षक, नागरिक उपस्थित होते.

 

* बॉक्स *

*गुणवंत विद्यार्थी व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार!*

भारतीय संविधानाची गौरवगाथा या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात नारायणन आय. ए. एस.अकॅडमी तर्फे शालेय विद्यार्थ्यांना भव्य मार्गदर्शन महाशिबिर व स्पर्धा परीक्षा व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार तर सायंकाळच्या सत्रात सेवा निवृत्त कर्मचारी यांचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, शिल्ड, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना भारतीय संविधान या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.