राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परिवर्तन जन आशिर्वाद यात्रेला नागरिकांकडून उत्फुर्स प्रतिसाद

0
456

यात्रेदरम्यान नागरिकांनी मांडल्या विविध समस्या

तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते रविकांत खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वाखाली दि. 23 सप्टेंबर रोजी मौजा सितेपार येथून सुरू झालेल्या जन आशिर्वाद यात्रेने सात दिवसांत 70 गावे फिरत युवा नेते रविकांत बोपचे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामांच्या लेखाजोखा नागरिकांपुढे ठेवत आशिर्वाद मागितला व क्षेत्रात नवं परिवर्तन करण्याचे आवाहन केले. या यात्रेला सर्वच गावात चांगला प्रतिसाद व नागरिकांची साथ मिळत आहे.

दि. 23 सप्टेंबर पासून सुरू झालेली परिवर्तन जन आशिर्वाद यात्रा ज्या गावांमध्ये फिरत आहे, त्या गावांमध्ये गावातील सामान्य नागरिकांनी युवा नेते रविकांत बोपचे यांच्या समोर आपल्या विविध समस्या व अडचणी मांडत आहेत. राज्य सरकार विविध योजनांचा पाऊस पाडत आहे, मात्र त्या जमिनीवर उतरत नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे. यासह विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, घरकुल, रेशनकार्ड, नुकसान भरपाई या सारख्या असंख्य योजनांचा समावेश असून विद्यमान आमदार यांचा प्रशासनावर वचक नसल्याने शासकीय कार्यालयांमध्ये बेबनशाही व भ्रष्टाचार वाढला असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

या यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसाद व साथ करिता रविकांत बोपचे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. व आगामी काळातही अशीच साथ, प्रेम व आशिर्वाद पाठीशी ठेवण्याची विनंती नागरिकांना केली आहे.