प्रतिनिधी / गडचिरोली
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असुन, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठा प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने २८ सप्टेंबर २०२४ ला ट्रक वाहन क्र. एम एच १२ एफ. झेड. ८९३१ ने काही इसम अहेरी ते सिरोंचा रोडने अवैध दारुची वाहतुक करणार आहे. अशी गोपनिय माहिती मिळाली.मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी उप-पोस्टे रेपनपल्ली पोउपनि. संतोष काजळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आलापल्ली ते सिरोंचा रोडवर कमलापुर टि-पाईट जवळ सापळा रचुन बसले असतांना. सकाळी ०६:०० वा. चे दरम्यान एक संशयीत ट्रक वाहन हे भरधाव वेगाने येतांना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन थांबवून वाहनामध्ये असलेल्या इसमांचे नावे विचारले असता, त्यांनी आपले नाव संजय महिपत सावंत (५१) रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व त्यासोबतच दुसरा इसम नामे सुनिल प्रकाश पवार, (३२) रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर असे सांगितले.त्यानंतर त्यांना वाहन अडविण्याचे कारण सांगून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात ९० एम.एल रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारुचे ५०२ बॉक्स, प्रति बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकुण ५० हजार २०० नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल अंदाजे किंमत एकुण १७ लाख ५७ हजार रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले जुने टाटा कंपनीचे २५१८ सी मॉडेल ट्रक, वाहन क्र. एम एच १२ एफ. झेड. ८९३१ अंदाजे किंमत ८ लाख रुपये असा एकुण २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे रेपनपल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप.क्र. ११/२०२४, मदाका कलम ६५ (अ), ८३ अन्वये आरोपी नामे संजय महिपत सावंत (५१) व्यवसाय चालक, रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व सुनिल प्रकाश पवार (३२), व्यवसाय – क्लीनर, रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेपनपल्ली पोउपनि. संतोष काजळे, पोउपनि. सतिश पवार, मपोउपनि प्रियंका मेश्राम, नापोअं/ १८६९ नैताम, पोअं/४२१९ यादव, पोअं/५५ गायकवाड, पोअं/८५ तुंकलवार चापोअं/८०९५ चिंतमवार यांनी पार पाडली.