तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्रात बांधकाम कामगारांना पेटी व जीवनोपयोगी कीट मिळण्याकरिता अतोनात त्रास भोगावे लागतात व दलाल मंडळीना हाताशी घ्याव लागत त्यानंतर आता शासनाच्या बांधकाम विभागाकडून या कीट चे वाटप करत असतांना कोणतीही खबरदारी किवां योग्य नियोजन केल जात नाही कारण दिनांक २९ सप्टेंबर रोजी मोहाडी येथील परमात्मा एक भवन येथे तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील असंख्य बांधकाम लाभार्थी कामगार यांच्या या कडाक्याच्या उन्हात आपल्या चिमुकल्या मुलानां सोबत घेऊन पहाटे ५-६ वाजे पासून उपाश्यापोटी रांगेत उभे असतात, त्यांना कोणतीही बसण्याची किवां आरोग्याची सोय नाही , अनेकदा त्या चिमुकल्यांना चक्कर ,उल्टी आणि ताप सुद्धा येतो . महिलांना रात्री ७ ते ८ वाजतात घरी जायला. हे सभागृह मोहाडी – रामटेक महामार्गावर आहे आणि हा नियमित भरधाव वाहनाने ये-जा होत असलेला मार्ग आहे यात बांधकाम लाभार्थी यांच्या अलोट गर्दी मुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो व बांधकाम कामगारांना सुद्धा अपघात किवां ईजा होण्याची शक्यता टाळता येत नाही तसेच या अलोट गर्दी चा फायदा घेत काही टवाळखोर व गुंड पद्धतीचे व्यक्ती तेथील महिला भगिनींची छेडछाड व हुलडबाजी करत असतात तसेच दिवसभराच्या उन्हापासून अनेक महिला व बाळांचे आरोग्य धोक्यात आले आहे ,
या सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून एका जिल्हा परिषद क्षेत्रातील लाभार्थाना – एक दिवस अस नियोजन करून तुमसर तालुक्यातील लाभार्थ्याकरीता तुमसर विभागातच पेटीचे वाटप करावे जेणे करून एकाच ठिकाणी अलोट गर्दी होणार नाही अश्या पद्धतीने लाभार्ध्याना बोलवावे जेणे करून चेंगराचेंगरी होणार नाही आणि गैरसोय टाळता येईल , तसेच त्यांतील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनाने तेथे सुरक्षा रक्षक किवां पोलीस अधिकारी तैनात करावे तसेच महिलांच्या व बालकांच्या आरोग्याकरिता शासकीय रुग्णवाहिका सोबत चिकित्सक तैनात करावे तसेच लाभार्ध्याना सावलीमध्ये बसण्याकरिता हिरव्या मेट ची व्यवस्था करावी अश्या पद्धतीने नियोजन करून बांधकाम कामगार घरगुती साहित्य व पेटी वाटप करावे.
अश्या प्रकारचे निवेदन बांधकाम कामगार विभाग,तहसीलदार,पोलीस प्रशासन,आमदार कार्यालयाला दिले आणि सांगितले की या प्रकारचे कार्यक्रम घेत असतांनी हे लक्षात असू द्यावे कि आपण गरजू मजुरांना हे लाभ मिळावे या करीता करीत असतो न कि त्यांची शारीरक – मानसिक पिळवणूक ह्यावी हे नेहमीच लक्षात असू द्यावे अन्यथा शिवसेना आपल्या कामगार बांधवांसाठी सदैव रस्त्यावर उतरण्यास तयार आहे आपण या निवेदनाचा त्वरित विचार करून योग्य उपाय – सोय व नियोजन करून वाटप कार्यक्रम करावे अन्यथा शिवसेना मोहाडी तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे महालगाव उपसरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख श्री.मधुभाऊ बुरडे यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे खडसावले या प्रसंगी विधानसभा समन्वयक डॉ.हेमंत राहांगडाले,उपतालुका प्रमुख श्री.लक्ष्मण पवणकर,शहर प्रमुख श्री.नारायण निखारे,उपशहर प्रमुख श्री.प्रकाश मारबते,युवसेना तालुका प्रमुख डॉ.प्रणय चव्हाण,युवासेना उपतालुका प्रमुख श्री.प्रवीण गायधने आदी उपस्थित होते.