आमगाव : जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा, तिगाव येथे विशेष पालकसभेच्या आयोजनाने शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. कुंजनकुमार तुरकर होते, तर निमंत्रक म्हणून उच्चश्रेणी मुख्याध्यापिका रेखा रहांगडाले उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत प्रशांत तुरकर यांची अध्यक्ष, दुर्गाप्रसाद शेंडे यांची उपाध्यक्ष, आणि आर. वाय. रहांगडाले यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. यासोबत धनराज कोटांगले, सुरेश बघेले, अजय बोपचे, शिवलाल सराटे, मंगला नागपुरे, रामकला पारधी, गीता बिसेन, दमयंता बोपचे, धनवंता सेऊत, जया कटरे, ममता बिसेन हे सदस्य म्हणून निवडले गेले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मोहित नूतनलाल बोपचे व आयुषी दुर्गाप्रसाद पटले यांची निवड करण्यात आली.
सभेचे संचालन रामेश्वर बागडे यांनी केले आणि येटरे यांनी सहकार्य केले.

