सालेकसा / बाजीराव तरोने
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे निकाल नुकतेच जाहीर झाले. या स्पर्धेत इंग्रजी विषयाच्या श्रेणीत सालेकसा येथील बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक गणेश श्रीराम भदाडे यांनी जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
प्रा. गणेश भदाडे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यासह सालेकसा तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेत त्यांनी सादर केलेला व्हिडिओ शिक्षणातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.