विधानसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
817
1

गोंदिया, दि. 1: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, लोकसभा निवडणुकीच्या अनुभवाच्या आधारे, निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. यंत्रणांनी आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात, आणि मतदान प्रक्रियेत कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

तसेच, मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.