



आमगांव : आज दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे शालेय गणवेश वाटप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष केवलचंद भाजीपाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण येरपुडे, दिलीप राऊत, माजी तंटामुक्त अध्यक्ष भुवनप्रसाद शिवणकर आणि मुख्याध्यापक एन. बी. बिसेन यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक एस. एस. वाकले, डब्ल्यू. डी. किरमोरे, एम. बी. वैध्ये (विषय शिक्षक), कु. एस. जे. जाधव, जी. पी. शिवणकर, व्ही. एस. डोंगरे, आणि शिक्षणप्रशिक्षणार्थी एस. आय. बिसेन यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या सर्व शिक्षकवर्गाच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व शालेय जीवनातील गणवेशाचे महत्त्व सांगितले.


