सडक अर्जुनी (1 ऑक्टोबर) – महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने आयोजित “दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा – 2023” मध्ये आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, खजरी येथील चार शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ₹42,000/- चे पारितोषिक पटकावले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊन शिक्षकांनी त्यांच्या क्षेत्रात कौशल्य दाखवत दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ तयार केले, ज्यामुळे त्यांना जिल्हा आणि तालुका स्तरावर मान्यता मिळाली आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि त्यांची कामगिरी:
1. श्री. ए.डी. मेश्राम, वर्ग 6 ते 8 (सामाजिक शास्त्र गट): तालुका आणि जिल्हा प्रथम पुरस्कार (₹26,000/-)वर्ग 9 ते 10 (भाषा गट): तालुका आणि जिल्हा प्रथम पुरस्कार
2. श्री. कुलदीप पटले ,वर्ग 6 ते 8 (भाषा गट): तालुका आणि जिल्हा प्रथम पुरस्कार (₹13,000/-)
3. श्री. जे. वाय. लंजे,वर्ग 6 ते 8 (सामाजिक शास्त्र गट): तालुका तृतीय स्थान (₹1,500/-)
4. श्री. महेश हत्तीमारे,वर्ग 6 ते 8 (विज्ञान गट): तालुका तृतीय स्थान (₹1,500/-)
या यशस्वी शिक्षकांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष जे.एस. रहांगडाले, सचिव एन.एन. येळे, उपाध्यक्ष सौ. सी.एन. येळे, सहसचिव सौ. विमलताई रहांगडाले, कोषाध्यक्ष डॉ. सचिन रहांगडाले, सदस्य डॉ. रूपाली रहांगडाले, तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभीए, गटशिक्षणाधिकारी सुभाषराम बागडे आणि प्राचार्य डी.डी. रहांगडाले यांच्या कुशल मार्गदर्शनाला दिले आहे.
बहुजन हिताय जगत कर्मचारी सह. पत संस्था मर्यादित खजरी चे अध्यक्ष से.नि. प्राचार्य खुशाल कटरे, शिक्षक पालक संघ
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही या यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.
![](https://newsprabhat.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240726-WA0017-1.jpg)
![](https://newsprabhat.in/wp-content/uploads/2024/11/Screenshot_2024-11-29-14-09-27-68_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg</div> </div>
<footer>
<!-- post pagination --> <!-- review -->
<div class=)