आमगावमध्ये ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ ची नवीन शाखा स्थापन

0
204
1

आमगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायत आमगावचे पदाधिकारी तहसीलदार आमगाव यांची दि.30 सप्टेंबर रोजी भेट घेऊन, ग्राहक पंचायतची नवीन शाखा गठीत करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी 2019 च्या नवीन ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तसेच, नगर परिषद आमगाव अंतर्गत सर्व रस्त्यांवरील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी देखील करण्यात आली.

या बैठकीसाठी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष वसंत मेश्राम, उपाध्यक्ष राजकुमार मोदी, सचिव लक्ष्मण खंडाईत, कोषाध्यक्ष बेनेश्वर कटरे, संघटन मंत्री जगदीश शर्मा, तसेच सदस्य नरेंद्र बहेटवार आणि प्रदीप बिसेन उपस्थित होते.

नवीन शाखेच्या स्थापनेमुळे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.