पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे येथील कार्यालयात आज दि.1 ऑक्टोबर ला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. शरद पवार साहेब यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या चर्चेत कार्याध्यक्ष मिथुन मेंश्राम, जिल्हा महासचिव तिरथ येटरे, उपाध्यक्ष बालू वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष आशिष येरणे, भुमेश शेंडे, राहुल भोयर, आणि देवानंद तागडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर चर्चा करून आगामी रणनीती ठरविण्यात आली.मा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा आहे.

