शिवसेना (शिंदे गटाचा) तुमसर विधानसभा मतदारसंघांवर दावा.. अतिथी गृह तुमसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती..

0
290
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर:आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. भंडारा जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट )पक्षाचा प्रभाव असल्याने या दोन्ही ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख नितीन सेलोकर यांनी माहीती दिली आहे.तुमसर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेने आपला उमेदवार दिला होता ‌.त्यामुळे यावेळी सुध्दा तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट)पक्षाचा दावा असणार आहे.तुमसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ सुध्दा होता अशी माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली.या संबधी नुकतिच मुंबईत शिवसेना शिंदे गट पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे. व त्या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील भंडारा-पवनी ,व तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा दावा राहणार असल्याचे सुतोवाच देण्यात आले.मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघांत पक्षाची लोकप्रियता आहे.व येथे एकनाथ शिंदे,व‌ बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पक्षाला येथे यशाची खात्री आहे. असे असले तरी जागा वाटपाबाबत महायुतीतील मित्रपक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही सेलोकर यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी उपजिल्हाप्रमुख नरेश उचीबगले युवा सेना भंडारा जिल्हा प्रमुख नितीन सेलोकर ,शिवसेना तालुकाप्रमुख अनिल द्रुगकर ,युवा सेना शहर प्रमुख ललित ठाकरे, राजेश वाघमारे, उपस्थित होते.