



गोंदिया : भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांना विशेष आदराचे स्थान आहे. त्यांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या हिताची काळजी घेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. भविष्यकाळातही ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव आणि मार्गदर्शन समाजाला लाभत राहील, असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त श्री जैन यांनी ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि आनंददायी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
आज गोंदिया येथील बापट लॉन, कन्हारटोली येथे गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री जैन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणि उत्साह भरण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सर्वश्री डी यु रहांगडाले, माधुरी नासरे, दुलिचंद बुद्धे, ऍड. लखनसिंग कटरे, नारायण प्रसाद जमईवार, संजय कटरे, अनुप शुक्ला, दिलीप देशमुख, शरद क्षत्रिय आणि मोहन कोतवाल यांच्या सह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.


