हरवली आहे….

0
392

गडचिरोली /प्रतिनिधी

प्रियंका मोरेश्वर वलादे हे दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 11 ते 12 वाजेच्या दरम्यान कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली आहे. सदर महिला आहे संतोष रामचंद्र ताटीकोंडावार वय 40 वर्षे राहणार नागेपल्ली तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली. यांच्याकडे राहत होती. सदर महिला ही संतोष ताटी कोंडावार यांच्या सागील भावाची मुलगी आहे. सदर महिलेचे कळमटोला तालुका धानोरा गडचिरोली येथील मोरेश्वर वलादे यांच्यासोबत आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते परंतु मागील काही दिवसापासून दोघांचे पटत नसल्याने प्रियंका ही आपले काका संतोष ताटीकोंडावार यांच्याकडे नागेपल्ली येथे राहत होती. काल 30 सप्टेंबर रोजी अचानक दुपारच्या वेळेस ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाईक व शेजाऱ्यांना फोन करून सुद्धा तिचा पत्ता लागला नाही त्यामुळे संतोष ताटी कोंडावार यांनी अहेरी पोलीस स्टेशन मध्ये सदर महिला बेपत्ता झाल्याची तोंडी तक्रार आज एक आक्टोंबर रोजी दिली आहे.. सदर महिला कोणाला दिसल्यास तात्काळ 9405635963 या क्रमांकावर किंवा अहेरी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे.

(बेपत्ता महिलेचे वर्णन :- उंची पाच फूट,चेहरा – गोलाकार,नाक:- सरळ, रंग:- गोरा,:-बांधा :-मजबूत,केस:- काळे लांब अंगावर लाल रंगाची टॉप व काड्या रंगाचा पॅन्ट गळ्यात मंगळसूत्र )