आमगांव : आझाद समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. भुवन साखरे यांची पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. साखरे हे पक्षाच्या स्थापनेपासून सक्रिय असून, सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यात नवा जोम येईल, अशी आशा सर्वपक्षीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

